Rutu Lyrics in Marathi | Rutu Kavita Marathi Lyrics

 ऋतू | Rutu Lyrics in Marathi | Rutu Kavita Marathi Lyrics

Rutu Lyrics in MarathiRutu Lyrics in Marathi 

झुळझुळ वारे वाहू लागले 

लाल पालवी तरूवरी

फुलाफुलानी लावल्या वेली

आंबेरे मोहरली

आभाळायचे निळेनिळेपण

कुहूकुहू कोकीळ करी

वसंत आला घरोघरी


ग्रीष्म पातला सूर्य तापला 

ऊन कडक जिकडे तिकडे

खूप तापते जमीन तिजवर 

जागोजागी पडती तडे

गरम झळांच्या ऐन दुपारी 

छाया शोधता गुरे पाखरे

उन्हात खेळू नका बरे 


वारे सुटले मेघ उसळले 

गडगडती ते आभाळी 

वीज कडकडे लखलख करुनि 

सर सर सर वर्ष आली 

सुटे मातीचा वास चहूकडे

कागद होड्या सोडायाची पावसात मौज असे 


शरद येई अन मेघ पळाले 

गुबगुब्बीत जणू चहूकडे 

हिरवे हिरवे मळे तसे 

हिरवी झाडे हिरवी शेते

तुडुंब भरले तळे निळे

चांदण्यात वाटे बागडावे

हेमंताचे दिवस पातले

भारे हुडहुडी अंगात 

शेतकऱ्याची गोफण फिरते

गरगर भरल्या शेतात 

हवेहवेसे ऊन वाटते 

शेकोटीच्या भवती रात्री 

गप्पाना भरती येते


उदासवाणा शिशिर ऋतू ये

पाने पिवळी पडती 

सोसाट्याचा वार्यासंगे

झर झर झर झर गळती 

झाडून पाने झाडे सगळी 

केविलवाणी दिसतात 

पाचोळा उरतो वाऱ्यात


सहा ऋतूंचे चाक फिरतसे

शिशिर ऋतूही जाईल तेव्हा

वसंत सांगे हळूच मीही

येतो मागोमाग पहा

Rutu Lyrics in English


Facebook
YouTube
Instagram
WhatsApp