Marathi Balbharati Kavita lyrics for seventh standard standard (2006)
खाली दिलेल्या कविता महाराष्ट्र शासनाच्या बालभारती मराठी पुस्तक इयत्ता satavichya आहेत ज्या २००६ साली अभ्यासक्रमाचा भाग होत्या.आपण त्यांचा आस्वाद घ्यावा आणि आठवणींमध्ये गुंगून जावे–satvichya kavita balbharati
मराठी माती
-कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर)
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यांतील शिळा
हिच्या कुशीत जन्मले , काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर , कधी मागावयास दान
स्वर्णसिहासनाने कधी लावली ना मान
हिच्या गगनात घुमे , आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतिल
मायदेशातील शिळा
समतेचे हे तुफान उठले
-विंदा करंदीकर
ऊठ ऊठ सह्याद्रे , घुमवीत बोल मराठी खडे
समतेचे हे तुफान उठले, उठले सागराकडे
हीच मराठी जिच्या मुखाने वादळी ज्ञानेश्वरी
शिवबाने तरवार घासली याच मराठीवर
हिच्या स्वागतासाठी झाडाले तोफांचे चौघडे
टिळक , गोखले ,फुले ,रानडे, आगरकर-वैखरी
स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी
ह्या ज्योतीवर दीप पेटवा , चला भविष्याकडे
स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे
तेच मराठे आम्ही , आम्हीही सह्याद्रीचे सुळे
स्वराज्यातूनी पुढे चला रे , चला सुराज्याकडे
दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्र अंगना
कंकण नादा भिउनि तयांच्या शत्रू सोडिती रणा
वीज माळूनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे
ऊठ खेडुता पुन्हा एकदा झाडूनिया घोंगडी
ऊठ मजुरा पुन्हा मारण्या आघाडीवर उडी
एकजूट हि पाहून पडतील अन्यायाला तडे
पावसात खंडाळा
-शांता शेळके
हिरवी झाडत, पिवळा डोंगर
निळी सावळी दरी
बेट बांबूचे त्यातून वाजे
वाऱ्याची पावरी
कभिन्न काळ्या खडकांमधुनी
फुटती दुधाचे झरे
संथपणाने गिरक्या घेती
शुभ्र शुभ्र पाखरे
सोनावळीच्या सोनफुलांचा
बाजूस ताफा उभा
तलम धुक्याची निळसर मखमल
उडते भिडते नभा
हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ
अंग झाडतो भिजला वारा
त्यात नवा दरवळ
डूल घालुनी जलथेंबांचे
तृणपाते डोलते
शील घालुनी रान पाखरू
माझ्याशी बोलते
गोजिरवाणे करडू होऊन
काय इथे बागडू?
पाकोळी का पिवळी होऊन
फुलाफुलांतून उडू ?
बिनभिंतींची शाळा
-ग दि माडगूळकर
बिनभिंतींची उघडी शाळा
लाखो इथले गुरु
झाडे वेळी पशु पाखरे
यांशी गोष्टी करू
बघू बंगला या मुंग्यांचा
सूर ऐकुया त्या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवत
फिरते फुलपाखरू
हिंदू ओढे धुंद ओहळ
झाडावरचे काढू मोहळ
चिडत्या डसत्या मधमाश्यांशी
जरा सामना करू
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ
ऐन दुपारी पऱ्ह्यात पोहू
सायंकाळी मोजू चांदण्या
गणती त्यांची करू
डोंगरी शेत
-नारायण गंगाराम सुर्वे
डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती
आलं वारीस राबून मी मरावं किती
कवळाचे भारे बाई ग घेऊन चढाव किती
आडाचं पाणी बाई ग पाणी वडावं किती
घरात तान्हा माझा ग तान्हा रडलं किती
तसाच रडं ऐकून पान्हा येईल किती
आलं आलं वरीस जमीन नांगरून
उभं पीक नाचे सोन्याने फुलून
पर एक मेला सावकार ठोला
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून आम्ही मरावं किती
या संसारा बाई संजय येईना
रक्त गाळून अंग धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरात पडेना
टीचभर पोटाला हातभार देहाला जपावं किती
अक्षय ऱ्हाया कुंकू कापला
संसार वेलीच्या फुलवाय फुलं
रूप नाव आणू माय धरतीला
तोडू जुलमाचा काच , हे रावणी फास
एकिच निशाण हाती
माणूसपण गारठलंय
-शशिकांत शिंदे
पूर्वी कसा पाऊसकाळ
चार महिने असायचा
हिरवागार रान पाहून
माणूस खुशीत हसायचा
प्रत्येकाची कणगी भरून
धान्य मोप असायचं
दूधदुभते तूप लोणी
याला माप नसायचं
पसाभर धान्य तर चिमणीचं दारात टिपण्याची
पै पाहुण्यांसाठी माय
दिवसरात्र खपायची
सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा
भजन कीर्तन करीत गाव
आखि रात्र बसायचा
एवढ्या तेवढ्या पावसावाचून
सारं चित्र पालटलंय
गावपण हरवल्यानं
माणूसपण गारठलंय
आई
-यशवंत
आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी
ती हाक येई कानी मज होई शोकाकारी
नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी
आई कुना म्हणू मी आई घरी ना दारी
हि न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
चारी मुखी पिल्लांच्या चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई
वात्सल्य माउलीचे आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का आम्हास नाही आई
येशील तू घराला परतून केधवा गे
दवडू नको घडीला ये ये निघून वेगे
हे गुंतले जीवीचे पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे करण्यास येई वेगे
रुसणार मी न आता जरी बोलशील रागे
ये रागवाव्याही परी येई येई वेगे