Yalgar Lyrics in Marathi |Guru Thakur Lyrics of Poem | Marathi Kavita Lyrics

Yalgar Poem Lyrics in Marathi |Guru Thakur Lyrics of Poem | Marathi Kavita Lyrics

Yalgar Lyrics in Marathi


Yalgar Lyrics in Marathi


नशीबास ’कर हवे तेवढे वार’ म्हणालो

’मानणार ना तरी कधी मी हार’ म्हणालो

केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
’खुशाल यावे उघडे आहे दार’ म्हणालो

खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला ’तैयार’ म्हणालो

रिचवून सारे तुडंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही ’आभार’ म्हणालो

कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते…
हसून त्याला ’केवळ खांदे चार’ म्हणालो

रडलो नाही… लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन्‌ ’यल्गार’ म्हणालो

Yalgar Lyrics in English


Facebook
YouTube
Instagram
WhatsApp