Lek chalali several
lyrics in Marathi
Lek chalali sasarla Marathi song is from movie Lek chalali sasarla starring Alka Kubal and Mahesh Kothare. The song is sung by Suresh Wadkar.
Lek chalali sasarla lyrics in Marathi
मायपित्यांच्या सावलीतील काळ सुखाचा ओसरला
लेक चालली सासरला
लेक चालली सासरला
मायपित्यांच्या सावलीतील काळ सुखाचा ओसरला
लेक चालली सासरला
लेक चालली सासरला
तळहातांचा करून पाळणा
बाळ सानुली जोजवली
फुलासारखे जपून छकुली
जीव लावूनी वाढवली
लग्नगाठ बांधून सुकन्या
परक्याहाती सोपवली
सुखात नांदो लेक लाडकी
सुखात नांदो लेक लाडकी
हेच मागणे देवाला
लेक चालली सासरला
गालांवरुनी हात फ़िरवुनी आई पोटाशी धरते
पोर पोटीची झाली परकी वडिलांचे मन गहिवरते
काळजातली माया ममता
डोळ्यांमधून पाझरते
नव्हेच अश्रू आशीर्वच हे
नव्हेच अश्रू आशीर्वच हे
त्यात अर्थ सगळा भरला
लेक चालली सासरला
लेक चालली सासरला
मायपित्यांच्या सावलीतील काळ सुखाचा ओसरला
लेक चालली सासरला
लेक चालली सासरला