मराठी म्हणी| Marathi Mhani in Marathi | Marathi mhanee

Marathi Mhani in Marathi | Marathi mhanee

Marathi Mhani in Marathi

 1. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून प्रारंभ-मुळात कमी तयारी असलेल्या व अडखळत असलेल्या कार्यात अनेक बाधा येणे
 2. ज्याचंजळतं त्यालाच कळतं-आपले दु:ख आपल्यालाच सोसावे लागते
 3. गाढवं मेलं ओझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने-समजदार व्यक्ती काम करत आपले जीवन व्यतित करतात तर मुर्ख मनुष्य काम न समजल्याने त्रस्त जगतो.
 4. आगीतून निघून फुफाट्यात पडणे-एका संकटातून निघून दुसर्या संकटात सापडणे
 5. आंधळीपेक्षा तिरळी बरी-एखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले
 6. आई जेवू घालीना बाप भिक मागू देईना-दोन्हिकडून संकटात सापडणे
 7. आसू ना मासू , कुत्र्याची सासू-जिव्हाळा नसताना वरवर कळवळा दाखविणे
 8. घोंगडे भिजत पडणे-एखादी गोष्ट खूप दिवसापासून प्रलंबित असणे
 9. तहान लागल्यावर विहीर खोदणे-गरज लागल्यानंतरच एखाद्या गोष्टीसाठी तयारी करणे
 10. समुद्रामाजी फुटकें तारू-चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी पण असतात
 11. जेथे पिकतं तिथे विकतं नाही-एखादी गोष्ट विपुल प्रमाणात असलेल्या भागात त्या गोष्टीचे महत्त्व राहत नाही.
 12. दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत-रिकामटेकडा मनुष्य आपण खूप व्यस्त आहे असे दर्शवितो.
 13. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा-क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे.
 14. जशास तशे-समोरच्या व्यक्ती व्यवहारानुसार आपला व्यवहार ठरवावा
 15. दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठं-दिवसभर आपला वेळ वाया घालवून शेवटच्या क्षणास धावा-धाव करणे.
 16. आपली पाठ आपणास दिसून येत नाही-आपले दोष आपल्याला दिसत नाहीत
 17. डोळ्यात अंजन घालणे-एखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करुन फसविणे
 18. दोघींचा दादला उपाशी-एकाच वेळी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे कोणताही अपेक्षित लाभ न होणे.
 19. कुसंतानापेक्षा नि:संतान बरे-वाईट मुले पोटी जन्मल्यापेक्षा मुले जन्मालान आलेली चांगली
 20. अंथरूण पाहून पाय पसरावे-आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे
 21. झाकली मूठ सव्वा लाखाची-दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
 22. दगडावरची रेघ-कायमची गोष्ट
 23. खिशात नाही दमडी अन बदलली कोंबडी-ऐपत नसताना बडेजाव दाखविणे
 24. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे-दुसऱ्यांचे न ऐकता स्वतःचे निर्णय स्वतःघेणे
 25. आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आली-अक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते तडीस जाणे कठीण असते
 26. जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात-दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही शकते
 27. आठ हात लाकुड, नऊ हात धलपी-एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे
 28. आईची माया न पोर जाई वाया-अति लाडाने मुल बिघडते
 29. अपयश हे मरणाहून वोखटे-अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे
 30. कर नाही त्याला डर कशाला-दोषी नसताना कसलेही भय राहत नाही
 31. अतिपरीचयेत अवज्ञा-अतिघनीष्ट सबंध हानिकारक ठरू शकतो
 32. घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर-कोणताही विचार न करता विसंगत कृत्य करणे
 33. गंगेत घोडं न्हालं-सर्व इच्छा पूर्णत्वास जाणे
 34. नरोवा कुंजरोवा-कोणत्याही गोष्टीबाबत भाष्य न करणे, केल्यास संभ्रम निर्माण करणे
 35. पाण्यात राहून माशाशी वैर बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे?
 36. ठेवीले अनंते तैसेची राहावे-जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानावे
 37. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून-आपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पणनुकसान होवो ही मनीषा मनात बाळगणे
 38. नाव सगुणी अन करणी अवगुणी-नावाप्रमाणे न राहता वाईट कृत्य करणे
 39. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही-कष्टाशिवाय यश मिळत नाही
 40. चालत्या गाडीला खीळ घालणे-एखाद्याच्या चांगल्या कामात व्यत्यय आणणे
 41. ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला-दोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे.
 42. वारा पाहून पाठ फिरवावी-वातावरण पाहून वागावे
 43. ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो-कारभारी व्यक्ती बदलली तरी फारसे बदल होत नाही अन तोच तो गोंधळ उडतो.
 44. छत्तीसाचा आकडा-विरुद्ध मत असणे
 45. आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते-एकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा
 46. काळ आला होता पण वेळ आली नव्हती-प्राणांतिक संकटातून वाचणे
 47. आचार तेथे विचार-चांगली संस्कृती चांगल्या विचाराना जन्म देते
 48. अप्पा मारी गप्पा-काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात
 49. चोरीचा मामला हळू हळू बोंबला-वाईट गोष्ट सर्व बाजूंनी झाकण्याचा प्रयत्न होतो.
 50. खिशात न्हाई आणा, अन ह्याला बाजीराव म्हणा-गरीब मनुष्यास कोणीही कीमत देत नाही
 51. अडाण्याचा गेला गाड़ा,वाटेवरची शेते काढा-मूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो
 52. तुझी दाढी जळू दे पण माझी वीडी पेटू दे-दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा स्वार्थ साधणे
 53. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी-जिवलग दोन व्यक्तींची भेट जवळ असूनही न होणे.
 54. कठीण समय येता कोण कामास येतो-आपल्या अडचणीच्या वेळेस कोणीही मदतीला येत नाही
 55. दगडा पेक्षा वीट मऊ-छोट्या गोष्टीत समाधानी राहणे
 56. पेराल तसे उगवेल-कर्मानुसार तसे फळ मिळते
 57. चांभाराची नजर जोड्यावर-आपआपल्या व्यवसाया संबधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो
 58. आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे-मोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते
 59. चढेल तो पडेल-फार गर्व केला तर पराजय निशित असतो
 60. कर्कशेला कलह तर पद्मिनीला प्रीती गोड-दुष्ट स्त्रीला भांडणे आवडतात तर गुणवतीला प्रेम आवडते
 61. दहा गेले पाच उरले-आत्मविश्वास कमी होणे.
 62. नाव सोनुबाई अन हाती कथलाचा वाळा-नावाप्रमाणे महती नसणे
 63. संगत गुण से सोबत गुण-दोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे
 64. नव्याचे नऊ दिवस-नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही
 65. आपण हसे लोकाला अन घाण आपल्या नाकाला-ज्या दोषाबद्दल लोकास हसायचे, तोच दोष आपल्यात असताना दुर्लक्ष करणे
 66. शेरास सव्वाशेर-प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
 67. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर-कोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे
 68. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे-अधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते
 69. चोर सोडून संन्याश्याला फाशी-अपराधी व्यक्तीस दंड न करता निष्पाप व्यक्तीला त्रास देणे
 70. चमत्कारास नमस्कार करणे-विशेषस असाध्य गोष्टीना मानाने
 71. उंच वाढला एरंड तरी होईना इक्षुदंड-छोट्या गोष्टी मोठ्यांशी बरोबरी करू शकत नाही.
 72. अक्कल खाती जमा-नुकसान होणे
 73. गर्वाचे घर खाली-गर्व असलेल्या माणसाचा पराजय होतोच
 74. अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी?-एकाच्या चुकीसाठी इतर लोकाना दोष लावणे
 75. तोबरयाला पुढे ,लगमला मागे-फायद्याचा वेळी पुढे पुढे ,कामाच्या वेळी मात्र मागेमागे
 76. कमरेचे सोडले नि डोईला बांधले-सर्व लाजलज्जा टाकून देणे
 77. बाळाचे बाप ब्रह्मचारी-निष्पाप वाटणाऱ्या व्यक्ती दोषी असणे
 78. श्वानाचीया भुंकण्याला हती देईना किंमत-बलवान व्यक्ती दुर्बल माणसाला किंमत देत नाही
 79. आंधळ्या प्रजेत हेकणां राजा-असहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो
 80. बाबाही गेला दशम्या गेल्या-एकाच दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे
 81. द्या दान सुटे गिरान (ग्रहण)-एखादा आशावाद दाखवून द्रव्याची अपेक्षा करणे
 82. तरण्याला लागली कळ अन म्हातारयाला आल बळ-तरुण माणूस आळशी असतो
 83. इजा बिजा तीजा-एकसारख्या होणाऱ्या घटना टाळता येत नाही
 84. एका हाताने टाळी वाजत नाही-भांडणात एकाचीच चुकी नसते, प्रत्येकाची थोडी चूक असतेच असते
 85. नसून खोळंबा असून दाटी- एखाद्या प्रमुख व्यक्तीचा कोणताही उपयोग न होणे
 86. दांत कोरून पोट भरतो-उपजिवीकेसाठी फार थोडे श्रम घेऊन जीवन व्यतीत करणे.
 87. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना-दोन्ही बाजूंनी अडचण
 88. आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कारटं-स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे
 89. आपण सुखी तर जग सुखी-आपण आनंदात असता सर्व जग सुखी वाटणे
 90. अंधारात केले तरी उजेडात आले-गुप्तपणे केलेली गोष्ट कधीही सर्वाना कळू शकते
 91. चोराच्या मनात चांदणे-वाईट व्यक्ती कायम कुटिल डाव रचत असतो
 92. आपण चिंतीतो एक पण देवाच्या मनात भलतेच-प्रत्येकच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही
 93. इकडे आड तिकडे विहीर-दोन्ही बाजूनी संकटात सापडणे
 94. खायला कोंडा निजेला धोंडा-अत्यंत दारिद्य असणे
 95. खाल्ल्या घराचे वासे मोजणे-ज्या घरात राहतो त्याच घराशी बेईमानी करणे
 96. सरड्याची धाव कुंपणा पर्यंतच-दुर्बळ माणूस एका मार्यादेच्याआतच काम करतो
 97. आज अंबरी उद्या झोळी धरी-कधी थाटामाटात तर कधी दरिद्री राहणे
 98. आकारे रंगती चेष्टा-माणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याचा कार्याचा अंदाज करता येत नाही
 99. ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा-बाह्य स्वरूपावरून व्यक्तीच्या स्वभावाची पारख करता येत नाही
 100. दुधाची तहान ताकावर-छोट्या गोष्टीत समाधानी राहणे
 101. आईजीच्या जिवावर बाईजी उदार-दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे
 102. गाढवापुढे वाचली गीता ,कालचा गोंधळ बरा होता-चांगले ज्ञानदिल्यावरही व्यक्तीचे वाईट वागणे
 103. चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा-चांगली गोष्ट स्वतः पासून सुरवात करावी
 104. इच्छा तसे फळ-मनात चांगले विचार ठेऊन केलेले कार्य यशस्वी होतेच
 105. आपल्या अळवाची खाज आपणास ठावी-आपले दोष आपल्यालाच माहित असते
 106. ठकास महाठक-प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच
 107. नर का नारायण बनणे-कर्म करून उच्च होणे
 108. दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त-मुलांपेक्षा नातवंडांवर अधिक प्रेम असणे.
 109. मनी वसे ते स्वप्नी -आपण ज्या गोष्टीचा सदैव विचार करतो तीच गोष्ट आपल्याला आसपास दिसते (आभास होतो)
 110. आधीच मर्कट तशातच मद्य प्याला-आधीच विचित्र बुद्धीचा,अन अवास्तव प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्याच्या चेष्टाना उत येतो
 111. प्रयत्नांती परमेश्वर -खूप कष्ट करण्याची तयारी असली की कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते
 112. करवंदीच्या जाळीला काटे -चांगल्या वस्तूबरोबर वाईट गोष्टींचा सामना करावयास लागायचाच
 113. हपापाचा माल गपापा-अती हव्यासाने असलेले द्रव्य ही नष्ट होते
 114. उपसा पसारा मग देवाचा आसरा-आधी कामा करावे मग देव देव करावे
 115. ओळखीचा चोर जीवे मारी-एखाद्याला आपण गुन्हा करताना पाहिल्यास तर तो आपल्या जिवावर उठतो
 116. सुंभ जळतो पण पिळ जळत नाही-भरपूर शिक्षा होऊन सुध्दा वाईट प्रवृत्ती नष्ट करता येत नाही
 117. छडी लागे छमछम विद्या येई घमघम-कठीण परिश्रम व दंड यामुळेच यश मिळते
 118. जळी स्थळी काष्ठी पाषाणी असणे-सर्वदूर असणे
 119. बडा घर पोकळ वासा-श्रीमंत असून कंजूष असणे, श्रीमंत असण्याचा आव आणणे
 120. दुःख रेड्याला न डाग पखालीला-एखाद्याच्या त्रासामुळे दुसरा चांगला व्यक्ती त्रासात पडणे.
 121. खायला काळ भुईला भार-ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
 122. चोराच्या उलट्या बोंबा-गुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे.
 123. करायला गेलो एक आणि झाले भलतेच-चांगले करायला गेले तरी वाईट घडणे
 124. घरोघरी मातीच्या चुली-सर्वदूर सारखीच परिस्थिती असते
 125. दारात नाही आड म्हणे लावतो झाड-साधने नसताना एखादी गोष्ट हौस म्हणून करणे
 126. उडदामाजी काळे-बेरे चांगल्या गोष्टी सोबत वाईट गोष्ट असु शकते
 127. ओठात एक नि पोटात एक-प्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार.
 128. एकूण घेत नाही त्याला सांगू नये काही-जो एकात नाही त्याला समजावण्याचा प्रयत्न करू नये
 129. इकडे आड तिकडे विहीर-कोंडी होणे
 130. शेरास सव्वाशेर-प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच
 131. एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही-एकसारखे अनेक स्त्रोत उपलब्ध असता काम थांबत नाही किंवा श्रीमंत व्यक्तीचा काही पैसा खर्च झाला तरी त्याचा परिणाम होत नाही
 132. अडला हरी गाढवाचे पाय धरी-अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
 133. पुढच्यास ठेच मागचा शहाणा-एकाच मार्गावरील पुढील व्यक्तीस वाईट अनुभव आल्यास तो मागच्या माणसा साठी मार्गदर्शक ठरतो
 134. आशेची माय निराशा-निराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये
 135. दैव देते कर्म नेते-कर्म वाईट केले तर चांगल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो
 136. उडत्या पक्षाची पिसे मोजणे-सहज चालता बोलता एखाद्या गोष्टीची पारख करणे
 137. वाऱ्यावरती वरात काढणे-स्वतः नियोजन न करता दुसऱ्यावर विसंबून महत्त्वाचे कार्य करणे
 138. एक नूर आदमी दस नूर कपडा-माणसाचा रुबाब नीटनेटक्या पोशाखाने वाढतो
 139. ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळी-आपल्या मालकाचे गुणगान करणे
 140. एका माळेचे मनी-सर्वजण येथून तेथून सारखे
 141. गावात नाही झाड अन म्हणे एरंडया ला आले पान-एखादी गोष्ट उगीचच वाढवून सांगणे
 142. जळत घर भाड्याने कोण घेणार?-संकटग्रस्त गोष्ट कोणालाच आवडत नाही
 143. ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ-कष्ट न करण्याची सवय असलेला मनुष्य कुठेही आयते खायला मिळाले की डल्ला मारतात
 144. आधीच आम्हाला हौस, त्यात पडला पाऊस-एखाद्या अचानक ठरलेल्या गोष्टीत बाधा उत्पन्न होणे
 145. ओ म्हणता ठो येईना-कसलेही ज्ञान नसणे, लिहिता वाचता न येणे
 146. गोगल गाय पोटात पाय-वरून दुर्बळ वाटणारे आतून स्वार्थी असू शकतात
 147. एकादशीच्या घरी शिवरात्र -एका दरिद्री माणसाचा दुसऱ्या दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही.
 148. दे माय धरणी ठाय करणे-खूप त्रस्त होणे
 149. अन्नछ्त्रात मिरपूड मागू नये-गरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो
 150. जिथे कमी तेथे आम्ही-पडेल ते काम करून समोरच्यास हातभार लावणे
 151. दुष्टी आड सृष्टी-आपल्या पाहण्यापलीकडे पण जग आहे
 152. कडू कारले तुपात तळले,साखरेत घोळले तरी ते कडू ते कडूच-वाईट व्यक्तीचीवाईट सवय कधीही जात नाही
 153. नव्याची नवलाई-एखाद्या नवी गोष्टीचा उदोउदो करणे
 154. करून गेला गाव अन दुसऱ्याचेच नाव-एकाने केलेल्या गुन्ह्याचा आरोप दुसऱ्यावर ठेवणे
 155. चोर तो चोर वर शिरजोर-गुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे.
 156. जिकडे सुई तिकडे दोरा-घनिष्ट संबंध असणारे एकमेकांजावळ कायम असतात.
 157. शेखी मीरविणे-उगाचच मोठ्या गोष्टी करणे
 158. नाचता येईना आंगण वाकडे-स्वतः येत नसलेली गोष्ट न करता इतर गोष्टीस बोल लावणे
 159. ओढाळ गुराला लोढणे गळ्याला-गुन्हेगाराला कायद्याचा वाचक बसावयास हवा
 160. नाकाचा बाल-अत्यंत प्रिय व्यक्ती
 161. गड आला पण सिंह गेला-एक महत्त्वाची गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट दूर जाणे
 162. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग-एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे
 163. हात दाखवून अवलक्षण-उगाचच विविध गोष्टी मागे धावून हसे करुन घेणे
 164. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार-एखादी गोष्ट अस्तित्वात नसतांना त्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे
 165. उंटावरचा शहाणा-मूर्ख सल्ला देणारा
 166. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे-नावाप्रमाणे लोक नसतात
 167. घोडामैदानजवळ असणे-परीक्षा लवकरच होणे
 168. चोराच्या वाटा चोरालाच माहीत-वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे मार्ग व स्त्रोत माहिती असतात
 169. गाजराची पुंगी वाजली तर वाजली ,नाहीतर मग मोडून खाल्ली -एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झालातर ठीक,नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे
 170. जो श्रमी त्याला काय कमी-कष्ट करणाऱ्या व्यक्तीस काही कमी पडत नाही.
 171. भरंवशाच्या म्हशीला टोणगा-पूर्ण निराशा करणे
 172. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा-भरपूर द्रव्य असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे
 173. एका हाताने टाळी वाजत नाही-दोष दोन्हीकडे असतो
 174. नावडतीचे मीठ अळणी-नावडत्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट आवडत नाही
 175. प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो-प्रत्येकाचा दिवस येतो
 176. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास -आधीच हौशीने केलेलं काम अन त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे
 177. रात्र थोडी सोंगे फार-काम भरपूर, वेळ कमी
 178. तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी-जोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.
 179. दानवाच्या घरी रावण देव-जसा आपला स्वभाव तसे आपले श्रद्धास्थान बदलते.
 180. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी-उद्योगी मनुष्य जीवनात यशस्वी होतो व त्याची भरभराट होते
 181. कोळसा उगाळावा तेवढा काळा-वाईट व्यक्तीचा अनुभव कायम वाईट असतो
 182. दुष्काळात तेरावा महिना-संकटात अधिक भर पडणे
 183. कळते पण वळत नाही-चांगल्या गोष्टी कृतीत आणता येणे कठीण आहे
 184. डल्ला मारणे-दुसऱ्याची वस्तू चोरणे
 185. ओठी तेच पोटी-बोलावे तसे वागावे, सरळमार्गी माणूस
 186. काकडीची चोरी अन फाशीची शिक्षा-थोड्याश्या अपराधानंतर फार मोठी शिक्षा करणे
 187. दाम करी काम-पैशाला किंमत असते
 188. गरज सरो नि वैद्य मरो-स्वार्थी मनुष्य दुसऱ्यांचा विचार करत नाही
 189. दिवस बुडाला मजूर उडाला-टाम-टून काम करून निघून जाणे.
 190. खाई त्याला खव खवे-ज्यांनी चोरी केली अस्वस्थ होतो
 191. काविळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते-आपणास ज्या गोष्टी जसे विचार करतो तश्याच वाटतात
 192. ओसाड रानात एरंडाचा उदो उदो-अशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो
 193. करून करू भागले अन देवपूजेला लागले-वाईट गोष्टींचा वीट आल्यावर चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे
 194. खिळ्यासाठी नाल गेला अन नालीसाठी घोडा-व्यवस्थित नियोजन नसल्याने अपरिमित नुकसान होणे
 195. आठ पुरभय्ये अन नऊ चौबे-जमत नसल्यास सगळ्यांची चूल वेगवेगळी असते
 196. ताकापुरते रामायण-एखादी गोष्ट मिळेपर्यंत संवाद साधणे. स्वार्थ साधल्यावर तडक निघून जाणे.
 197. ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल-वाईट कृत्य स्वतःलाच भोगावे लागते
 198. दुर्दैवाचे दशावतार होणे-अनेक बाजूने संकट येणे
 199. ६ अचाट खाणे मसणात जाणे अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते
 200. कसायाला गाय धार्जिणी-गुंडांच्या पुढे लोकं नमतात व पुढे पुढे करतात
 201. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही-दुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या माणसाचे नुकसान होऊ शकत नाही
 202. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा-भरपूर द्रव्य असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे
 203. जावे त्याचा वंशा,तेव्हा कळे-एखाद्या व्यक्तीचे दु:ख त्याच्या जवळ गेल्यावर कळते
 204. दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात कापूस वेचीत-दिवसभर आपला वेळ वाया घालवून शेवटच्या क्षणास धावा-धाव करणे.
 205. गरिबान खपाव ,धनिकान चाखाव-जीवावर कोणीही बलाढ्य दुबळ्या माणसाच्या आपला फायदा करून घेतो
 206. ज्याचंजळतं त्यालाच कळतं-आपले दु:ख आपल्यालाच सोसावे लागते
 207. औषधा वाचून खोकला गेला-परस्पर संकट टळले
 208. चार आण्याचा मसाला बारा आण्याची कोंबडी-एखाद्या छोट्या गोष्टीची किंमत कमी आणि इतर खर्च खूप जास्त असणे
 209. कामा पुरता मामा -व्यावहारीक जगात स्वार्थ बाळगणे
 210. अती झालं अऩ हसू आलं-एखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते
 211. आईचा काळ नि बायकोशी मवाळ-आईशी वाईट वागून बायकोला महत्त्व देणे
 212. नाक दाबले की तोंड उघडते-मनस्थितीत हवे ते काम एखाद्यास कोंडीत पकडून ऋण घेता येते
 213. नाकापेक्षा मोती जड-महत्वाची गोष्ट सोडून इतर गोष्टीला महत्त्व येणे
 214. ओल्याबरोबर सुके जळते-दुष्टांच्या बरोबर राहिल्याने सज्जन माणसास ही त्रास होतो
 215. उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला-एक लहान पत असलेली व्यक्ती दुसऱ्या गरीब व्यक्तीची बरोबरी करू शकत नाही.
 216. वाचाल तर वाचाल-शिक्षण घेतले की तरच प्रगती होऊ शकते
 217. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे-प्रत्येकाचा दिवस असतो
 218. उथळ पाण्याला खळखळाट फार-अपरिपक्व ज्ञान असणारा व्यक्ती उगाच ज्ञानप्रदर्शन करतो
 219. बुडत्याला काठीचा आधार-संकटग्रस्त मनुष्यास छोटी मदत सुद्धा मोठी वाटते
 220. नकर्त्यांचा वार शनिवार-काम न करणारा व्यक्ती फक्त बहाणे सांगतो
 221. दही वाळत घालून भांडण-एखाद्या नुकसानाची तमा न बाळगता वैर करणे सुरूच ठेवणे
 222. जावयाचं पोर हरामखोर-माणसाची प्रवृत्ती आपल्या स्वार्थ साधण्यासाठीच असते.
 223. गाढवाच्या पाठीवर गोणी-कष्टकरी माणसाला तया कष्टा संबधित लाभ मिळत नाही तो लाभ इतरांना मिळतो
 224. आकांक्षापुढती गगन ठेंगणे-आशावाद ठेवल्यास कोणतेही लक्ष्य साध्य होते
 225. अपुऱ्या घड्याला डबडब फार- कमी बुद्धिवान माणूस आपले ज्ञान उगाच सर्वदूर सांगत सुटतो
 226. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न-असलेल्या व अडखळत मुळात कमी तयारीअसलेल्या कार्यात अनेक बाधा येणे
 227. हातावर तुरी देणे-एखाद्याच्या कचाट्यातून सुटणे
 228. आवळा देऊन कोहळा काढणे-अल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे
 229. गरजवंताला अक्कल नाही-असहाय्य माणूस कोणाकडेही मदतीची याचना करतो
 230. काखेत कळसा गावाला वळसा-जवळ असलेली वस्तू सर्वदूर शोधणे
 231. एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला-एकाच माणसाचा भरपूर लोकाना त्रास होणे
 232. उकराल माती तर पिकतील मोती-शेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात
 233. दिवसा चुल रात्री मूल-दिवस-रात्र कामाचा त्रास असणे.
 234. दिसतं तस नसतं म्हणून जग फसतं-दिखाऊ गोष्टी या कायम तकलादू असतात, मुळात वेगळेच काही असते.
 235. अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ-दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.
 236. इच्छिलेले घडते तर भिक्षुकही राजे होते-सर्व इच्छेप्रमाणे झाले असते तर सर्व लोकं धनवान झाले असते
 237. घोडं झालया मराया अन बसणारा म्हणतो मी नवां-दुसऱ्याचे दु:ख न पाहता आपलाच विचार करणे
 238. खाली मुंडी पाताळ धुंडी-स्वभावाने गरीब वाटणारा मनुष्य ही धोकेदायक असू शकतो
 239. अति राग भीक माग-क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही
 240. यज्ञास बळी बोकडाचा-दुर्बळ व्यक्तीला कठीण काम करण्यास सांगणे
 241. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही-वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही
 242. जो खाईल आंबा तो सोशेल ओळंबा -एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना त्याचे दोष स्वीकारावे
 243. तळ हाताने सूर्य झाकला जात नाही-छोट्या गोष्टीनी फार मोठे व थोर बाबी दडवता येत नाही
 244. आपल्या गल्लितच कुत्रे शिरजोर-आपल्या भागात आपला वरचष्मा ठेवणे
 245. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही-काही गोष्टी स्वतःअनुभावल्याशिवाय कळत नाही
 246. थेंबे थेंबे तळे साचे -काटकसर केल्यास बरीच शिल्लक मागे पडते
 247. दांत आहे तर चणे नाहीत,चणे आहेत तर दांत नाहीत-सर्व गोष्टी उपलब्ध असल्यातरी त्याचा उपभोग घेता न येणे.
 248. लंकेत सोन्याच्या विटा-दुसऱ्याची श्रीमंती आपल्या काही कामाची नसते
 249. आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ-एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे
 250. एक ना धड भारभार चिंध्या-अनेक गोष्टी अपूर्ण करून , कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे
 251. उंदराला मांजर साक्ष-वाईट माणसाने दुसर्या वाईट माणसाविषयी चांगले सांगणे
 252. लेकी बोले सुने लागे-एकाला बोलल्यावर दुसऱ्याने त्यातील संदेश ओळखणे
 253. असतील शिते तर नाचतील भुते-संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात
 254. एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही-अत्यंत गुप्तपणे आपले कार्य करणे
 255. अडली गाय अन फटके खाय-अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे
 256. विंचवाचे बिहाड पाठीवर-फिरत्या माणसाचा ठाव ठिकाणा लागणे मुश्कील असते किंवा अस्थिर गोष्टी या कायम मूळ विषयापासून भटकतात
 257. उपट सूळ, घे खांद्यावर-नसते लचांड पाठीमागे लावून घेणे
 258. जसा गुरु तसा चेला-एका प्रमुख व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाल त्या व्यक्तीच्या स्वभावचेच लोक निर्माण होतात.
 259. देश तसा वेश-प्रदेशाप्रमाणे आपले संस्कार, पोशाख बदलतो.
 260. लंकेची पार्वती असणे-अत्यंत गरीब असणे
 261. वासरात लंगडी गाय शहाणी-मूर्ख लोकांमध्ये कमी बुध्धिवान मनुष्यसुद्धा प्रसिद्ध असतो
 262. गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे-जोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.
 263. शितावरून भाताची परीक्षा-फार थोड्या नमुन्यावरुन मोठ्या वस्तूंची चाचणी करणे
 264. उंटावरचा शहाणा-मूर्ख सल्ला देणारा
 265. उभ्याने यावे अन ओणव्याने जावे-कोणतेही काम स्वाभिमानाने करावे त्याचे श्रेय नम्रपणाने घ्यावे
 266. एकदा की नाव कानफाट्या पडले की पडलेच-लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात
 267. कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभट्टाची-तट्टाणी माणसाची तुलना दुर्बळ माणसाशी होऊ शकत नाही
 268. झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया-थोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते
 269. आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी-आधी वर्तन बिघडते मग मनुष्य कंगाल होतो
 270. ताकास जाऊन लोटा लपवणे-एखादी गोष्ट इच्छा नसतांना लपविणे
 271. आधी करावे मग सांगावे-कार्य तडीस गेल्याशिवाय त्याबद्दल उगाच बोलू नये
 272. जसा भाव तसा देव-आपली जशी श्रध्दा असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल.
 273. उचलली जीभ लावली टाळ्याला-बेताल बोलणे
 274. गावात घर नाही अन रानात शेत नाही-कफल्लक असणे, दरिद्री असणे
 275. खाण्याराला चव नाही रांधणारयाला फुरसत नाही-एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की ती गोष्ट मुक्तपणे सहन करणे भाग असते
 276. एका दगडात दोन पक्षी मारणे-एकाच कार्यात दोन काम करणे
 277. एकी हेच बळ-एकत्र समुदाय कायम जिंकतो
 278. दुधात साखर पडणे-एकाचवेळी अनेक गोष्टीचा लाभ होणे
 279. भित्यापाठी ब्रह्म राक्षस-भित्रा माणूस सदैव कोणत्याही छोट्या बाबीना घाबरतो.
 280. वराती मागून घोडे-एखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
 281. एका म्यानात दोन तलवारी राहत नाही-लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.
 282. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला-आपले काम दुसऱ्यावर ढकललेतर अपयश येते, कष्ट करणाऱ्या व्यक्तीस काही कमी पडत नाही
 283. एका कानाने एकवे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे-ऐकलेल्या सगळ्याच गोष्टींचा विचार करणे व्यर्थ आहे
 284. कोल्हयाला द्राक्षे आंबटच-न मिळणारी गोष्ट आवडत नाही असे दर्शवीणे
 285. घार हिंडते आकाशी परी तिचे चित पिल्लांपाशी-घर प्रमुखाचे लक्ष आपल्या मुलांकडेच असते
 286. उसाच्या पोटी कापूस-कर्तबगार व्यक्तीच्या वंशात आळशी माणूस असणे
 287. अंगाची लाही लाही होणे-खूप संतापणे
 288. एका पुताची माय वळचणीखाली जीव जाय-एक मुलगा पोटी असून सुद्धा तोआईला सुखाने जगू देत नाही
 289. चतुर्भुज करणे-अटक करणे
 290. राजा उदार झाला हाती भोपळा दिला-आशा असताना एखाद्या मोठ्या व्यक्तीने अपेक्षेनुसार काम न करणे
 291. झालं गेलं अन गंगेला मिळालं-भूतकाळाच्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करणे
 292. ध चा मा करणे-सांगताना एखाद्या मूळ गोष्टीत बदल करून आपला स्वार्थ साधणे
 293. केली खाता हरखले व हिशेब देता कचरले-कोणताही विचार न करता कर्ज करायचे व देणी वाढली की काळजी करायची
 294. आखुड शिंगी आणि बहुदुधी-सर्व आपल्या मनासारखे व्हावे असे वाटणे
 295. बोलाचीच कढी बोलाचाच भात-कार्य न करता वायफळ बडबड करणे
 296. घरचा उंबरठा दारालाच माहित-घरातील गोष्टी घरातल्या लोकांनाच माहित असते
 297. करायला गेले गणपती अन झाला मारुती-जे करायचे ते नित समजून करावे नाही तर भलतेच घडते
 298. गाढवाला गुळाची चव काय-मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टींची किंमत नसते
 299. नवी विटी नवे राज्य-नवीन राज्यकर्ते नवीन कायदे आणतात
 300. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये-एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
 301. हा सूर्य आणि हा जयद्रथ-पुराव्यासहित सिद्ध करणे
 302. घोडे खाई भाडे-एखाद्या गोष्टीवर भरमसाठ खर्च होणे
 303. कुन्हाडीचा दांडा गोतास काळ-दुसऱ्यांना इजा करताना आपल्यालाही इजा होऊ शकते
 304. काट्यावाचून गुलाब नाही-चांगली गोष्ट कठीण परीश्रमाने मिळते
 305. कशात काय अन फाटक्यात पाय-बडेजाव दाखविला तरी उपयोग नसतो
 306. खायला काळ भुईला भार-ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
 307. निर्लज्जम सदा सुखी-वाईट व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही
 308. एकावे जनाचे करावे मनाचे-सर्वांचे विचार एकूण आपला स्वतःचाच निर्णय घ्यावा
 309. आयत्या बिळावर नागोबा-कोणतेही काम न करता दुसर्याच्या जिवावर उपभोग घेणे
 310. शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड-आपल्या स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाचा विचार न करणे
 311. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये-छोट्या व्यक्तींना नेहमी कामे सांगितली जातात
 312. गतं न शौच्यम-एखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
 313. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ-एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होतो
 314. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे-कोणत्याही यश मिळवताना सुरवातीला अपयश येऊ शकते
 315. चतुर्भुज होणे-लग्न करणे
 316. गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ-मुखं मनुष्य आपल्या वागण्याने सर्वदूर गोंधळ उडवतो
 317. अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये-अपरिचित माणसाशी अधिक सलगी करू नये
 318. आधणातले रडतात अन सुपातले हसतात्त-दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते
 319. दक्षिणा तशी प्रदक्षिणा-व्यवसायात जसा लाभ असेल तसे महत्त्व आपल्या ग्राहकास देणे
 320. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी-दोन वेगवेगळ्या समूहाना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीला तोटा होतो
 321. करंगळी सुजली तर डोंगरा एवढी होईल काय-छोट्या माणसाला थोर माणसाची बरोबरी करणे अशक्य आहे
 322. चमडी जाईल पण दमडी जाणार नाही-पैश्यावर खूप प्रेम असणे, कंजूष असणे
 323. आले अंगावर घेतले शिंगावर-संकटाचा सामना धैर्याने करावा
 324. ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल-वाईट कृत्य स्वतःलाच भोगावे लागते
 325. उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही-धडधडीत नुकसान होत असताना न प्रतिकार करता माणसाला स्वस्थ बसवत नाही
 326. ग ची बाधा झाली-फाजील आत्मविश्वास बळावणे
 327. आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काकाच म्हटले असते-अशक्य गोष्टींची चर्चा करण्यात काही अर्थ नसतो
 328. वाड्याचे तेल वाग्यांवर-एका गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणे
 329. अठरा विश्वे दारिद्र असणे-अति दुर्बळ असणे
 330. इज्जतीचा फालुदा होणे-अपमान होणे
 331. जशी कामना तशी भावना-आपण जसे चिंतन करतो त्याप्रमाणे आपले विचार बनतात.
 332. अंगाचा तीळ पापड होणे-खूप संतापणे
 333. हत्ती होऊन ओंडके, मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी-मोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे
 334. ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा-जी कंटाळवाणी बाब असते तीच स्वीकारावी लागणे
 335. तळ्यात मळ्यात करणे-मनाची अवस्था अस्थिर असणे
 336. झाकली मूठ सव्वा लाखाची-दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
 337. आपलेच दात अन आपलेच ओठ-आपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे
 338. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र-स्वतःच्या व्यवसायात नामांकित असूनही आपल्या घरासाठी आपल्या व्यवसायासंबधित सुविधा देता न येणे
 339. कानामागून आली तिखट झाली-नवीन आलेली व्यक्ती लवकरच यशस्वी होणे
 340. तोंडाला पाने पुसणे-हमी देऊन समोरच्या व्यक्तीचे काम न करणे
 341. चोर नाही तर चोराची लंगोटी-भरपूर अपेक्षा असताना अल्प लाभावर समाधान मानणे.
 342. देवाची करणी अन नारळात पाणी-नैसर्गिक गोष्टींना तोड नसते
 343. डोंगर पोखरून उंदीर कढणे-जास्त श्रम करून कमी फायदा होणे
 344. अति शहाणा त्याचा बैल रिकामा-शिष्ट माणसाशी व्यवहार करताना लोक जपून वागतात त्यामुळे त्यांना काम करणे जड जाते
 345. अंतकाळापेक्षा मध्यांन्नकाळ कठीण मरणापेक्षा भुकेच्या यातना कठीण असतात
 346. पालथ्या घड्यावर पाणी-नि:र्बुध्ध व्यक्तीचे वर्तन सुधारत नाही
 347. देह देवळात चित्त पायतणात-एका ठिकाणी मन एकाग्र न करता ,दुसऱ्याच ठिकाणीचित्त घोटाळणे.
 348. केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा-अशक्य गोष्ट उशीरा हाती घेतलेली बरी
 349. देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं-उगाचच एखाधाची कुरापत काढणे.
 350. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन-अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे
 351. खाल्ल्या मिठाला जागणे-मालकाशी प्रामाणिक राहून संकट काळी मदत करणे
 352. बळी तो कान पिळी-बलवान माणूस दुर्बळ माणसांना पिडतो
 353. गाव तिथे उकिरडा-सर्व दूर सारखीच परिस्थिती असते
 354. अडली गाय खाते काय-गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो
 355. उन पाण्याने घर जळत नसते-एखाद्यावर खोटे आरोप केले तरी त्याची बेअब्रू होत नाही
 356. गरजेल तो बरसेल काय-मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मुळात काहीही काम करत नाहीत
 357. आठ हात काकडी नउ हात बी-एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे
 358. उधारीचे पाते अन सव्वा हात रिते-उधारीने घेतलेला माल मग कमीच भरणार
 359. खाता पिता दोन लाथा-कायम धाकात ठेवणे
 360. घरात नाही एक तीळ अन मिशाला पिळ-गरीब असताना श्रीमंतीची एट करणे
 361. शुद्ध नाही मन तया काय करी साबण-मनात कुविचार असता चांगले विचार ऐकणे व्यर्थ आहे
 362. आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी-गरजू माणसाला मदत न करता, गरज नसलेल्या माणसाला मदत करणे
 363. गुरवाचे लक्ष निविद्यावर-मनुष्य प्राण्याला स्वार्थाच्या गोष्टी लगेच कळतात
 364. वाळूचे कणही रगडीता तेलही गळे-कठोर परिश्रमामुळे कोणतीही गोष्ट साध्या होऊ शकते
 365. सरकारी काम अन बारा महिने थांब-काही कामं नेहमी विलंबाने होत असतात, त्या साठी धीर देणे योग्य
 366. झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया-थोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते
 367. उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती मुद्द्याचे काम सोडून भलतीच चौकशी करणे
 368. आपला हात जगन्नाथ-आपली उन्नती आपल्यावरच अवलंबून असते, आपल्या हातात अधिकार आला तर त्याचा दुरुपयोग करून जिन्नस लाटणे
 369. एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नये-एकाने वाईट गोष्ट केली तर आपल्यालाही वाईट गोष्ट करण्याचा हक्क पोहोचत नाही
 370. चुकणे हा मानवाचा धर्म आहे-मनुष्य प्राणी हा चुकू शकतो
 371. बोलण्यापेक्ष मौन श्रेष्ठ-अधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते
 372. दात कोरुन पोट भारता येत नाही-इकडून तिकडून आणलेल्या अल्प मिळकतीवर जीवन व्यतीत करता येत नाही
 373. अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही-एखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही
 374. जखमेवर मीठ चोळणे-आधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे
 375. घरात नाही कौलान रिकामा डौल-गरीब असताना श्रीमंतीची एट करणे
 376. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात-दोन मार्गांवर हात ठेऊन चालणे
 377. उंटावरून शेळ्या हाकणे-आळस, हलगर्जीपणा करणे
 378. राम कृष्ण आले गेले तरीही जग का चालायचे थांबले-व्यावहारिक बाबी कुणासाठीही थांबत नाही
 379. काम न धंदा, हरी गोविंदा-रिकामटेकडा मनुष्य फक्त बडबड करण्यात आपला वेळ घालवतो.
 380. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये-एखाद्या चांगल्या गोष्टीचा ती नष्ट होईल एव्हढा उपभोग घेऊ नये.
 381. दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये-महत्त्वाची व्यक्ती गेली तर फार मोठे नुकसान होते.
 382. खतास महाखत-प्रत्येक वाईट माणसास दुसर वरचढ माणूस मिळतोच
 383. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात-व्यक्तीचे गुणदोष सुरवातीच्या काळात लगेच कळतात
 384. चुकलेला फकीर मशिदीत-मनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो.
 385. कावळा बसायला अन फांदी तुटायला एकाच घात-योगायोगाने एखादी गोष्ट घडून भलत्याच गोष्टीचा संबंध वेगळ्याच गोष्टीला लावणे
 386. एक घाव दोन तुकडे-एका फटक्यात निकाल लावणे
 387. अति तेथे माती-कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम बिघडते
 388. ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल-मुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.
 389. आजा मेला नि नातू झाला-एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार
 390. वागावेच लागते कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी-सर्वाना प्राप्त परिस्थितीनुसार वागावेच लागते
 391. घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरीपान-काम न करता फक्त दिखाउपणा प्रदर्शित करणे
 392. दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते- दु:ख लवकर संपत नाही.
 393. कवड्यांचे दान केले अन गावात नगारे वाजविले-दान छोटे करून इतर लोकांना महती सांगत फिरणे
 394. चकाकते ते सोने नसते-बडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात
 395. उसाबरोबर एरंडाला पाणी -एखाद्या गोष्टीचा लाभ अनपेक्षितरीत्या दुसऱ्या जवळच्या गोष्टीला होतो
 396. उधार तेल खावत निघाले-उधारीच्या मालत काही न काही दोष असतो
 397. दिव्या खाली अंधा-मोठ्या व्यक्तीचे सुद्धा गुण दोष असतात
 398. काय ग बाई उभी घरात दोघी तिघी घरात-काम करणारे पुष्कळ वाढले की प्रत्येकजण कामचुकारपणा करू लागतो
 399. पायीची वहाण पायी बरी-योग्यतेप्रमाणे वागवावे
 400. शेंडी तुटो की पारंबी तुटो-एखाद्या गोष्टीचे परिणाम काय राहणार याची चिंता न करणे
 401. अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय-जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत, फक्त ते आचरणात आणले पाहिजेत
 402. उंदीर गेला लुटी अन आणल्या दोन मुठी-मनुष्य आपल्या कुवतीनुसार काम करतो
 403. आयत्या पिठावर रेखोट्या -कोणतेही काम न करता दुसर्याच्या जिवावरउपभोग घेणे
 404. बैल गेला नि झोपा केला-एखाद्या गोष्टीची निकड संपल्यावर त्या गोष्टीसाठी काम करणे
 405. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी-संस्कारी कुटुंबात चांगल्या व्यक्ती असतात
 406. बोलाचीच कढी बोलाचाच भात-खोटी आश्वासने देणे
 407. जपून पाऊल टाकणे-काळजीपूर्वक काम करणे
 408. उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक-एखाद्या गोष्टीची पारख लगेचच होत नाही त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो
 409. लहान तोंडी मोठा घास-छोट्या व्यक्तीने आवाक्या बाहेरच्या गोष्टी करणे
 410. उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते-गरीब व्यक्तीचे दिवस कधीही पालटू शकतात
 411. उंटावरून शेळ्या हाकणे-कोणत्याही कामात सहभाग न घेता उगाच फुकटाचे मार्गदर्शन करणे
 412. एका माळेचे मनी ओवायला नाही कुणी-सर्व एकसारखे असताना कोणीच काम करत नाही
 413. जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी-एखद्या ठिकाणी लाभ असता तिकडे विशेष लक्ष्य देणे.
 414. करीन ती पूर्व-अंगी असे कर्तुत्व असावे की जे ठरविले ते घडून आलेच पाहिजे
 415. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही-खरी मैत्री आगंतुक कारणाने तुटत नाही
 416. कुंपणानेच शेत खाणे-रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
 417. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही-स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे
 418. आपण शेण खायचं अन दुसऱ्याच तोंड हुंगायच-स्वतः वाईट कर्म करायचे अन दुसऱ्यावर संशय घ्यायचा
 419. दिवाळी दसरा हात पाय पसरा-सण बघून भरमसाठ खर्च करणे
 420. पी हळद आणि हो गोरी-उतावीळ होणे
 421. आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे-इतरांचा विचार न करता स्वार्थ साधणे
 422. आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ-आपली परिस्थिती चागली नसताना दुसऱ्याच्या परिस्थिती विषयी कळकळ दाखविणे
 423. कधी तुपाशी तर कधी उपाशी-पैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी राहायचे
 424. निंदकाचे घर असावे शेजारी-आपल्या टीकाकारांमुळे आपला विकास होतो
 425. दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो-कष्टकरी आपले पोट अत्यंत जिकिरीने भरतो
 426. चोरावर मोर-प्रत्येक वाईट माणसाला कधीतरी दुसरा वरचढ माणूस मिळतोच.
 427. तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे-एकाच दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे
 428. उत्तम शेती मध्यम व्यापार नि कनिष्ठ नोकरी -नोकरी पेक्षा व्यापार व व्यापारापेक्षा शेती उत्तम आहे
 429. हत्ती गेला शेपूट राहिलं-अवघड काम संपल्यानंतर छोटे (सोपे) राहणे
 430. ताकास तूर न लागू देणे-मनातील गोष्ट न सांगणे
 431. आली चाळीशी, करा एकादशी-परिस्थितीनुसार आपल्या सवयी बदलवणे
 432. कोल्हा काकडीला राजी-लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
 433. आमचे गहू आम्हालाच देऊ-आपल्याच वस्तूचा चतुराईने दुसऱ्याना लाभ न मिळू देता स्वतःच लाभ घेणे
 434. कुठेही जा पळसाला पाने तीनच-सर्वत्र परिस्थिती सारखीच असते
 435. लहानपण देगादेवा मुंगी साखरेचा रवा-मोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे
 436. अडाण्याची गोळी भल्यास गिळी-अशिक्षीत माणूस कोणालाही अडचणीत आणू शकतो
 437. गोरा गोमटा कपाळ करंटा-नुसते दिखाऊपण काही कामाचे नसते
 438. आचार भ्रष्ट नि सदा कष्ट-अनाचाराने वागणारा माणूस सदा दु:खी असतो
 439. दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा-एखादा मनुष्य एकाच ठिकाणी फार काहीअपेक्षा न ठेवता काम करतो.
 440. उठता लाथ बसता बुक्की-कायम धाकात ठेवणे
 441. उचलली जीभ लावली टाळुला-कोणताही विचार न करता बोलणे
 442. हातच्या कंकणाला आरसा कशाला-उघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते
 443. मूर्ती लहान पण कीर्ती महान-छोटा मनुष्य तरी कार्यक्षमता खूप असणे
 444. पहिले पाढे पंचावन्न-भरपूर समजावुन सुद्धा वाईट वागण्यात बदल न होणे
 445. गाव करी ते राव न करी-एकीचे बळ एकट्या माणसाच्या कामाच्या तुलनेत जास्त असते व त्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा साध्य होतात
 446. एकादशी अन दुप्पट खाशी-नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही
 447. फट म्हणताच ब्रम्ह-हत्या छोट्या गोष्टीवरुन दोषी ठरवणे
 448. बैल गेला अन झोपा केला-एखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
 449. एका कानावर पगडी घरी बाईल उघडी-बाहेर श्रीमंतीचा आव आणायचा व घरी दारिद्र्यात राहणे
 450. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच-वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही
 451. उभारले राजवाडे अन तेथे आले मनकवडे-श्रीमंती आले की त्यामागे हाजी हाजी करणारे येतातच
 452. अंगाची तलखी होणे-खूप संतापणे
 453. कुठे राजा भोज कुठे गंगुतेली-बलाढ्य माणूस आणि दुर्बळ यांची तुलना होऊ शकत नाही
 454. दाखवायचे दात वेगळे अन खायचे दात वेगळे-प्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार
 455. तू राणी मी राणी पाणी कोण आणी-दोन सुकुमार -नाजूक व्यक्ती कधीही काम करत नाही, असे व्यक्ती जवळ आल्यास एकमेकांचा एकमेकांना फटका बसतो
 456. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी-एका प्रदेशात सर्व गुणधर्माचे लोकं राहतात
 457. उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला-एखादे मोठे , कठीण काम हातात घेतल्यानंतर श्रमांचा विचार करायचा नसतो
 458. काळी बेंद्री एकाची अन सुंदर बायको लोकाची-सर्वाना आपल्या गोष्टीपेक्षा इतरांच्या चांगल्या आहेत असे वाटते
 459. तेरड्याचा रंग तीन दिवस-एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
 460. ऋषीचे कुळ अन हरळीचे मुळ शोधू नये-ऋषी अन महान अज्ञात गोष्टींचे मुळ शोधायचा प्रयत्न करू नये
 461. कुहाडीचा दांडा गोतास काळ-आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
 462. साखरेचे खाणार त्याला देव देणार-सगळ्यांशी आपुलकीने वर्तन केल्यास असाध्य बाब साध्य होऊ शकते
 463. जशी नियत तशी बरकत-आपले यश आपल्या चांगल्या विचारांवर अवलंबुन असते.
 464. खाजवून खरुज काढणे-एखाद्याची उगाचच कुरापत काढणे
 465. एकटा जीव सदाशिव-एकटा माणूस चिंतामुक्त अन सुखी असतो
 466. एरंडाचे गुर्हाळ-एखादी गोष्ट लांबलचक व कंटाळवाणी असणे
 467. चिंती परा ते येई घरा-वाईट चिंतन केले की तशीच घटना आपल्या आयुष्यात घडते
 468. आधी पोटोबा मग विठोबा-अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
 469. कुंपणानेच शेत खाणे-रक्षणकर्त्यानेच नुकसान करणेबलाढ्य
 470. तीन तिघाडा काम बिघाडा-एखादे काम भरपूर जणांनी लक्ष केंद्रित करून केले तर अपयश येऊ शकते
 471. सुंठेवाचून खोकला गेला-परस्पर संकट टळले
 472. अडला नारायण गाढवाचे पाय धरी-बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो
 473. काम नाही घरी अन सांडून भरी-काम नसताना उगाच काम निर्माण (वाढवून) तेच काम परत परत करणे
 474. कोंबड झाकलं तरी तांबड उगवल्या शिवाय राहत नाहीलपत नाही-सत्य कधीही लपत नाही.
 475. असंगाशी संग प्राणाशी गाठ-अयोग्य माणसाची सांगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो
 476. आलिया भोगासी असावे सादर-आलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते
Facebook
YouTube
Instagram
WhatsApp