Chotese bahin bhau lyrics in Marathi |छोटेसे बहीण भाऊ-वसंत बापट
Chotese bahin bhau lyrics in Marathi
छोटेसे बहीण भाऊ
उदयाला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ
ओसाड उजाड जागा
होतील सुंदर बाग
शेतांना मळ्यांना फुलांना फळांना
नवीन बाहेर देऊ
मोकळ्या आभाळी जाऊ
मोकळ्या गेल्याने गाऊ
निर्मल मनाने , आनंदभराने
आनंद देऊ अन घेऊ
प्रेमाने एकत्र राहू
नवीन जीवन पाहू
अनेक देशांचे , भाषांचे , वेशांचे
अनेक एकत्र होऊ