Contents
hide
Singer | Pandit Bhimsen Joshi |
Singer | Shrinivas Khale |
Song Writer | Sant Namdev |
वैष्णवां घरीं सर्वकाळ ।
सदा झणझणिती टाळ
कण्या भाकरीचें खाणें ।
गांठीं रामनाम नाणें
बैसावयासी कांबळा ।
द्वारीं तुळसी रंगमाळा
घरीं दुभे कामधेनु ।
तुपावरी तुळसी पानु
फराळासी पीठ लाह्या ।
घडी घडी पडती पायां
नामा ह्मणे नेणती कांहीं ।
चित्त अखंड विठ्ठलपायीं