Singer | Salil Kulkarni, Sandeep Khare |
Singer | Salil Kulkarni |
Song Writer | Sandip Khare |
Mi Pappacha Dhapun Marathi Lyrics are from a old Marathi kids song from Balgeet category. Mi Pappacha Dhapun lyrics are written by Sandip Khare. It is composed by Salil Kulkarniand sung by Salil Kulkarni, Sandeep Khare
Mi Pappancha Dhapun Phone lyrics in Marathi
मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
“हॅलो, हॅलो” बोलतंय् कोण?
“आमचे नाव खेलाशेठ, डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो साजूक तूप, साला चापून खातो आम्हीच खूप
तुम्ही कोण? काय तुमचे नाव? बोला झटपट कुठलं गाव?”
“कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !”
मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
“हॅलो, हॅलो” बोलतंय् कोण?
“लक्षुमबाई मी जोशांघरची, चोरून खाते अंडाभुर्जी
वरती कपभर दूध न् साय, घरात आत्ता कोनी नाय
तुम्ही कोण? काय तुमचे नाव? बोला झटपट कुठलं गाव?”
“कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !”
मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
“हॅलो, हॅलो” बोलतंय् कोण?
“मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त हजार
तुम्ही कोण? काय तुमचे नाव? बोला झटपट कुठलं गाव?”
“कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव”
मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
“हॅलो, हॅलो” बोलतंय् कोण?
“ढगामधून बोलतोय बाप्पा, चल मारू थोड्या गप्पा”
“बाप्पा बोलतोयस, तर मग थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
कालच होता सांगत पप्पा, तिकडे आलेत आमचे अप्पा
एकतर त्यांना धाडून दे, नाही तर फोन जोडून दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा
म्हणाले होते- जाऊ भूर्र, एकटेच गेले केवढे दूर !
डिटेल सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा.. बाप्पा बोला राव, सांगतो माझं नाव न् गाव”
कसले नाव नि कसले गाव, राँग नंबर लागला राव !
Mi Pappancha Dhapun Phone lyrics in Marathi