Marathi Balbharati Kavita lyrics for first standard (2006)

Marathi Balbharati Kavita lyrics for first standard (2006)


खाली दिलेल्या कविता महाराष्ट्र शासनाच्या बालभारती मराठी पुस्तक इयत्ता पहिलीच्या आहेत ज्या २००६ साली अभ्यासक्रमाचा भाग होत्या.आपण त्यांचा आस्वाद घ्यावा आणि आठवणींमध्ये गुंगून जावे…

Marathi Balbharati Kavita lyrics सरी 

टप टप थेंब

सर सर सरी

गाडगे मडके 

भर भर भरी

सरीवर सरी

झुलते पोर 

थुईथुई नाचे 

रानात मोर

आई 

अ अ आई 

अननस देई 


प प पपई 

मला दे ना ताई


अ आ आंबा 

गोड गोड असे 

खाताना सईबाई 

खुद्कन हसे 

कमळ


कमळ फुले
पाण्यावर डुले
बदक पहा 
तुरुतुरु चाले

पाण्यात मासा 
असतो जेथे 
टपून बसतो 
बगळा तेथे 

फुलपाखरू 

इमारतीच्या पुढे बघा हि सुंदर सुंदर बाग असे
नाजूक साजूक फुलपाखरू गिरक्या घालीत येई कसे

वाऱ्यावरती हिरवे हिरवे
गावात कोवळे छान डुले 
निळा जांबला तांबूस पिवळा
रंग लेवुनी येत फुले 

त्या रंगाचा झगा घालुनी
भिरभिरते हे फुलपाखरू
चित्र त्याचे काढू सुंदर 
पंखामधुनी रंग भरू 

भाजी 

चवदार चवळी दाणेदार कोवळी
वेलीला काकडी हिरवी पिवळी 
करडई चिरुया ताजी ताजी 
कढईत करू चवदार भाजी 
गाजर कसा लाल लाल चुटुक 
आवडीने खायचं मिटुक मिटुक 

दिवाळी

फट फटाका फुटला
धम धमाका झाला
लावा दिवा पणती
उजळू दे भिंती 
सण आला घरा
फराळाचं करा 
गुळसाखार हसली
करंजीत बसली
कुरकुरीत चकली 
पोटभर खाल्ली
चंदनाचा पाट
सोनीयाचे ताट 
आली आली दिवाळी 
बहीण भावा ओवाळी 

पाखरे 

उखळ मुसळ मांडलेले 
अवघे धान कांडलेले
थवा आला पाखरांचा 
दाणे टिपले सांडलेले 
पाखरं उडाली आभाळात 
आनंदानं गाणं गात 
आई म्हणाली परत या रे
पाहीन मी तुमची वाट 

शेतमळा

चला शेतात जाऊ
डोलता गहू पाहू

हिरवा हिरवा हरभरा 
वाढ वाढतो भराभरा

पातळ पाणी वळत
उसाला जाऊन मिळत

उंच उंच ऊस जाई 
गोड गोड रस देई 

आजी 

एक होती आजी 
शोधू लागली भाजी 
परसात होता भोपळा 
वेलीवरती झोपला
आजीला हवासा वाटला
हळूच देठ कापला
घरात अली आजी
भोपळ्याची केली भाजी 
भाजी घेतली ताटात 
भोपळा गेला पोटात

ऐरण

लोखंडाची ऐरण 
घनाचा झेलते घाव
बैलगाडीच्या चाकाची 
घट्ट बसते धाव
बैलगाडीत बसुया
धरणावरती जाऊया 
पाणीच पाणी पाहूया
त्याचीच गाणी गाऊ या

छकुली

बाहुली माझी धाकुलीं 
नाव तिचे छकुली
रंग तिचा कसा 
गोरा गोरा पण
हात पाय मऊ किती 
छान छान छान 
केस तिचे कसे
काळे काळे काळे
डोळे तिचे कसे 
निळे निळे निळे
ओठ बघा किती 
लाल लाल लाल
बालसंगे छकुली 
चाल चाल चाल 

औषध 

दौलत गेला बाजरी 
खाल्ली उघडी भेळपुरी 
उघडे खाऊन पोट दुखले 
शहरात जाऊन औषध घेतले 
उघडे शिळे खाल्ले नसते 
असणे दुखणे आले नसते

फुलबाग

बाग फुलाफुलांची आवडती मुलांची
गुलाबाचे फुल गालातच हासते
लाजाळू लाजरे लाज लाज लाजते
नाजूक साजूक जुई तिची बहीण जाई 
सुवासाने केवढी घमघमत राही 
आंबोलीशी बोलू चाफ्यासावे हिंदू 
सांगतसे झेंडू नका नका भांडू 
घरोघरी अंगणात फुलबागा किती 
गावोगावी आता फुलांचीही शेती 

असे कसे ?

असे कसे ?असे कसे ?रात्रीचेच चांदणे दिसे 
असे कसे ?असे कसे ? मोरालाच सुंदर पिसे 
असे कसे ?असे कसे ?पाण्यातच झोपती मासे 
असे कसे ?असे कसे ? आईसारखे कुणी नसे 

आनंद 

झाली सकाळ सारली रात
चला घासूया आपले दात
घर झाडून केर काढायचा 
टोपलीत सारा गोळा करायचा 
मोठाली नख ठेवूच नका 
वाढले केस कापून टाका 
नख वाढत माती भरते 
पोटात शिरता कुरकुर करते
गार गार पाणी बादली भरून 
हसत घ्यायची अंधोळ करून 
चांगले धुतले कपडे घातले 
मन आनंदी होईल आपले

दे 

ढगा ढगा 
पाऊस पाड पाणी दे 
पक्ष्या पक्ष्या 
सुंदर सुंदर गाणी दे

वाऱ्या वाऱ्या 
तुझ्यासारखं झुलू दे
फुला फुला 
तुझ्यासारखं फुलू दे 

मोरा मोरा 
तुझ्यासारखं नाचू दे 
राना राना 
हिरवं पुस्तक वाचू दे

झाडा झाडा 
उन्हात तुझी छाया दे 
आई आई 
कुशीत घेऊन माया दे 
Facebook
YouTube
Instagram
WhatsApp