Bedakichya Pillana Bail lyrics in Marathi | बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला – C. Ramachandra Lyrics

Bedakichya Pillana Bail lyrics in Marathi | बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला – C. Ramachandra Lyrics

Bedakichya Pillana Bail lyrics in Marathi



Singer C. Ramachandra
Singer C. Ramachandra
Music Balgeet
Song Writer Shanraram Nandgaonkar

Bedakichya Pillana Bail  Marathi Lyrics are from a old Marathi kids song from Balgeet category. Bedakichya Pillan lyrics are written by Shanraram Nandgaonkar. It is composed by C. Ramachandra and sung by C. Ramachandra


Bedakichya Pillana Bail pahila lyrics in Marathi

बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला !

‘हम्मा, हम्मा’, आवाज ऐकून पळे दूर
एवढा मोठ्ठा देह पाहुनी बेडुक घाबरला !

धावत धावत तळ्यात आले, सगळे बेडुक सावध झाले.
पाहून बेडकी बाईला, पिल्लू बिलगे आईला.

बेडकी म्हणते, “डराँव डराँव, का थरथरता बेडुकराव?”
दोन बाजूला हात पसरले, पिल्लू सारे सांगू लागले,
“एवढा मोठ्ठा, प्राणी आता, तळ्याच्या काठी चरत होता.
लठ्ठ चांगला असा भला !”

बेडकी म्हणाली, “डराँव डराँव, केवढा मोठ्ठा सांगा नाव?
जगात सार्‍या माझ्यापेक्षा, मोठा नाही कुणीच राव !”

पुढे येउनी, अंग फुगवुनी, पिल्लाला पाही विचारुनी,
“एवढा मोठ्ठा?”
“नाही आई याहुनी मोठ्ठा !”
पुन्हा तियेने अंग फुगविले, “एवढा मोठ्ठा?”
“नाही, नाही याहुनी मोट्ठा !”

बेडकी राही फुगवित पोटा, पिल्लू म्हणे तर याहून मोठ्ठा !
बघताबघता फट्ट जाहले, बेडकीचे मग पोटची फुटले !

अंगी नसता खरी योग्यता, उगाच करता बरोबरी,
जिवास मुकली खुळी बेडकी, तिची मोडली खोड पुरी !
म्हणून बढाई नको मुलांनो, खरं सांगतो तुम्हाला,
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला !