Nachya Got A Girlfriend । नच्या गॉट या गर्लफ्रेंड – Nachya Song Lyrics – girlfriend – top Marathi Movie – Jasraj Joshi Lyrics
Singer | Jasraj Joshi |
Movie | Girlfriend |
Music | Hrishikesh – Saurabh – Jasraj |
Song Writer | Kshitij Patwardhan |
The Nachya Got A Girlfriend Marathi Lyrics are from the Marathi Movie Girlfriend in 2019 .Nachya Got A Girlfriend Song is Composed by Hrishikesh – Saurabh – Jasraj, and Lyrics are written by Kshitij Patwardhan. The song Nachya Got A Girlfriend is Sung by Jasraj Joshi. The movie is starring Sai Tamhankar,Rasika Sunil, Isha Keskar, Kavita Lad Medhekar, Yateen Karyekar, Suyog Gorhe, Uday Nene, Sagar Deshmukh and Amey Wagh.
Nachya Got A Girlfriend Lyrics in Marathi :
हे असा कसा, सूर्य पश्चिमेला
अर्ध्या रात्री उगवला राव
इवलासा मोगली, टारझन झाला,
अरे डिझायरेबल झालं नाव
शेवाळी दगड हा, रॉक स्टार झाला,
आपटूनही पिक्चर हा, सुपरहिट निघाला
बघतोस काय रागानं,
डाव टाकलाय वाघानं,
एका फटक्यात केला विषय end,
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड !!
उपास सुटले नवस फिटले
नच्याला मिळाली गर्लफ्रेंड
अरे तोरण बांधा रे गावाला सांगा रे
नच्याला मिळाली गर्लफ्रेंड
ट्रम्प तात्यानी केलं
अभिनंदनचं टवीट सकाळी,
मला धप्पा धप्पा आले फोन
पॅनल डिस्कशन भरलं,
दुपारी सगळ्या चॅनलवरती,
अरे एवढा भारी आहे कोण?
संध्याकाळ पर्यंत देशात,
होर्डिंग लागले माझे
गूगल ने तर कौतुकाने,
डूडल केले ताजे
रणवीर पासून जस्टिन बीबर
पॅनिक झाले सारे
50 मिलियन फॉलोवर्स
रात्रीत फिरले नारे
रिजनल नॅशनल इशू मग
इंटरनॅशनल झाला
पुढचे जेम्स बाँड होता का?
आत्ताच फोन आला
ऐकून माझ्याच भुवया कपाळात गेल्या
खऱ्याखुऱ्या फँटसि मी, इमॅजिन केल्या
बघतोस काय रागानं
डाव टाकला वाघानं,
एका फटक्यात केला विषय एन्ड ,
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
मिठी खबर छे, घणो गजर छे
नचिकेत ने मळी छे गर्लफ्रेंड
हंसी छे जग मा, खुसी छे मन मा,
नचिकेत ने मळी छे गर्लफ्रेंड