Lovestory Song Lyrics |माझी स्टोरी | – Girlfriend – Jasraj Joshi, Shruti Athavale – Jasraj Joshi, Shruti Athavale Lyrics


Lovestory Song Lyrics|माझी स्टोरी | – Girlfriend – Jasraj Joshi, Shruti Athavale – Jasraj Joshi, Shruti Athavale Lyrics

Lovestory Song Lyrics in Marathi

Singer Jasraj Joshi, Shruti Athavale
Movie  Girlfriend
Music Hrishikesh – Saurabh – Jasraj
Song Writer Kshitij Patwardhan

The Lovestory Song Marathi Lyrics are from the Marathi Movie Girlfriend in 2019 .Lovestory Song is Composed by Hrishikesh – Saurabh – Jasraj, and Lyrics are written by Kshitij Patwardhan. The song Lovestory is Sung by Jasraj Joshi, Shruti Athavale. The movie is starring Sai Tamhankar,Rasika Sunil, Isha Keskar, Kavita Lad Medhekar, Yateen Karyekar, Suyog Gorhe, Uday Nene, Sagar Deshmukh and Amey Wagh.



Lovestory Song Lyrics in Marathi :

गार गार थिएटरात इंटरवल झाली
तिथेच आपल्या स्टोरीचा पहिला सीन आला
पॉपकॉर्न च्या गर्दीत झाली अशी धडक
डोळ्यांमधून काळजात घुसली तडक
हसून मला म्हणाली वूड यु लाईक अ बाईट ?
मनात म्हणालो वेडे हे तर..
हे तर लव्ह ऍट फर्स्ट साईट

माझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी
ह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी
पॉम पॉम पॉम

हे शिवनेरीच्या स्टॉप वर दुपारचं ऊन
त्यात ती दिसली अन गेलो गारठून
आली माझ्या नशिबात तिच्या शेजारचीच सीट
अचानक ओळखल्याची मी ऍक्टिंग केली नीट
अरे तू!

ला ला ला ला
खांद्यावर डोकं आलं मन झालं मोरपीस
मनातल्या मनात दिला हळूच पहिला किस
फूड मॉल आला तेव्हा उठून हसली स्वीट
म्हणाली माझ्यासाठी कॉफी आणतोस प्लीज
थँक्यू म्हणत प्रेमानं धरला माझा हात
एक सेल्फी घेतला वाटलं झाली सुरुवात

माझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी
ह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी पॉम पॉम पॉम
मग या कहाणीत एक ट्विस्ट आला उतरल्यावर एक भुरट्या पर्स घेऊन पळाला
हू आता मी झालो बच्चन केला पाठलाग
सोडवली पर्स अन अडकलो काळजात
त्या काळजाचा स्क्रीन खाली पडून फुटला
जेव्हा तिचा बॉयफ्रेंड मला आपणहून भेटला
त्याच्या बायसेप एवढी होती माझी कम्बर
मनात केलं मी ब्लॉक पण शेअर केला नंबर

मग ट्रान्सिशन
सुदैवाने बॉयफ्रेंड निघाला पोसेसिव्ह
ती म्हणे तो अग्रेसिव्ह
पण आपण खेळत राहिलो डिफेन्सिव्ह
पोसेसिव्ह , अग्रेसिव्ह, डिफेन्सिव्ह

हळूहळू शेअरिंग झालं ओह्ह हो हो
शेअरिंग चं केअरिंग झालं आह्ह हा हा
केअरिंग चं डेअरिंग झालं हम्मम्म
आणि मग डेअरिंग चं आणि मग डेअरिंग चं

मला वाटलं आता होईल खरी सुरुवात
तेवढ्यात तिला ऑफर आली मोठी परदेशात
विचारलंही नाही तिनं घेतला डिसीजन
मग मीही म्हटलं नको व्हायला आपण दुसरा ऑप्शन

ती गेली निघून
कायमची ताटातूट
sad सॉंग वियोलिन्स सगळं एकसाथ
दाढी वाढली जास्त डोळे खोल गेले आत
अनेक दिवस आठवणीत पिक्चर पाहिले जाऊन
पॉपकॉर्न च्या काउंटरपाशी पाहील उभं राहून

मग चौदा फेब्रुवारी!
हॅपी बड्डे माझा!
एक्साक्ट्ली बारा वाजता मेसेज आला तिचा
राहवत नाही सतत विचार तुझा
तुझ्याविना वेळ जात नाही माझा
तुझं हसणं हवंय तुझं रुसणं हवंय
तू नसलास तरी एकमेकांचं असणं हवंय

नुस्ता टेक्स्ट वाचूनही डोळ्यातून पाणी आलं
मग इंटरनॅशनल कॉल्स चं मोठं बिल आलं
अरे गाढवांनो इथे झाली कंप्लिट
आमची स्टोरी ट्विस्ट वाली टर्न वाली लव स्टोरी
ह्यांची स्टोरी कित्ती भारी हिट वाली लव स्टोरी

Lovestory Song Video:





Querida Querido Lyrics |केरीदा केरीदो |Girlfriend Marathi Movie – Jasraj Joshi, Shalmali Kholgade – Jasraj Joshi, Shalmali Kholgade Lyrics

Facebook
YouTube
Instagram
WhatsApp